राज्य मार्ग परिवहन महामंडळाची’ हिरकणी’ बस लवकरच नव्या रंगरउपआत
मुंबई दि.१७ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुण्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत नवी ‘हिरकणी’ बस आकाराला येत आहे. २०० नव्या ‘हिरकणी’ बस लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
‘हिरकणी’ची सध्याची रंगसंगती बदलून ‘हिरकणी’ला पांढरा आणि जांभळा रंग देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. भविष्यात पांढऱ्या-हिरव्याऐवजी पांढऱ्या-जांभळ्या रंगसंगतीत ‘हिरकणी’ दिसणार आहे. महामंडळाने २०१५-१६ साली नव्याने ‘हिरकणी’ बस तयार केली.