वाहतूक दळणवळण

परशुराम घाटातील चौपदरीकरणाच्या कामामुळे दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद

मुंबई दि.२७ :- मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील शेवटच्या टप्प्यातील अवघड ठिकाणच्या चौपदरीकरणाचे काम २७ मार्चपासून सुरु झाले आहे. परिणामी येत्या ३ एप्रिलपर्यंत दररोज सहा तासांसाठी घाट बंद राहणार आहे.

राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’

दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. सध्या जवळपास पाच किलोमीटर अंतराच्या घाटातील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती; चैत्यभूमीवर पुरविण्यात येणा-या सुविधांचा आढावा घेण्यासाठी बैठक

संपूर्ण घाटाचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू होऊन हा घाट पूर्ण क्षमतेने आणि सुरक्षितपणे वाहतुकीस खुला व्हावा, यासाठी शासकीय यंत्रणेसह संबंधित ठेकेदार कंपनीने नियोजन केले आहे. या कालावधीत हलकी वाहने चिपळूण-आंबडस मार्गे वळविण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *