राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
मुंबई दि.२७ :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती; चैत्यभूमीवर पुरविण्यात येणा-या सुविधांचा आढावा घेण्यासाठी बैठक
भाजपा-शिवसेना युतीचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले त्यांच्या या कार्यालाही गौरव यात्रेत उजाळा देण्यात येणार आहे, असेही शिंदे, फडणवीस म्हणाले.