बृहन्मुंबई महापालिका ‘एसबीआय’ अर्ध मॅरेथॉन प्रोमोरनला मुंबईकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई दि.२६ :- बृहन्मुंबई महापालिकेने आज आयोजित केलेल्या ‘फिट मुंबई बृहन्मुंबई महापालिका ‘एसबीआय’ अर्ध मॅरेथॉन प्रोमो रन’ उपक्रमाला मुंबईकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वय वर्षे १२ ते ८४ या वयोगटातील सुमारे ४ हजार २०० नागरिक यात सहभागी झाले होते. बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, भारतीय स्टेट बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक बी. शंकर, मुंबई मेट्रो परिमंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक जी. एस. राणा यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉन प्रोमो-रनला सुरुवात झाली.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून (२७ फेब्रुवारी) सुरू

बृहन्मुंबई महापालिका, भारतीय स्टेट बँक, भारतीय नौदल आणि मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचा-यांनी देखील सहभाग नोंदविला. आजचा ‘प्रोमो – रन’ हा ३ किलोमीटर, ५ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा तीन अंतरांमध्ये आयोजित करण्यात आला होता. आजच्या प्रोमो-रन‌ मध्ये सहभागी झालेल्या धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी भारतीय नौदलाचे वाद्यवृंद पथक एशियाटिक च्या प्रवेशद्वारापाशी तर बृहन्मुंबई पोलीस दलाचा वाद्यवृंदाने अमर जवान स्मृतीस्तंभाजवळ उपस्थित होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनानिमित्त उद्या ‘शोध हा नवा -शतजन्म शोधिताना’ कार्यक्रम

बृहन्मुंबई महापालिका शाळांमधील पन्नास विद्यार्थ्यांच्या वाद्यवृंद पथकानेही कला सादर केली. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीमची प्रात्यक्षिके सादर केली. ८४ वर्षीय रतनचंद ओसवाल यांनी १० किलोमीटरचे अंतर धावत पार केले. मुख्य अर्ध मॅरेथॉन ही येत्या १७ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित केली जाणार असून या अर्ध मॅरेथॉनच्या ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलरासू यांच्या हस्ते करण्यात आला.

rajesh

Recent Posts

कल्याण में धूमधाम से मनी महाराजा अग्रसेन जयंती

कल्याण। अग्रवाल समाज कल्याण समिति ने अपने कुलगुरु महाराजा अग्रसेन की 5179वीं जयंती का भव्य…

4 weeks ago

कल्याणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, सात आरोपींना अटक

कल्याण: कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची…

1 month ago

रासरंग २०२५: डोंबिवलीत शारदीय नवरात्रोत्सवाचा थाटामाटात होणार शुभारंभ

डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला 'रासरंग' शारदीय…

1 month ago

१७ सप्टेंबर विश्वकर्मा जयंतीला राष्ट्रीय श्रमिक दिन घोषित करण्याची मागणी

सचिन शिंदे  मुंबई, १७ सप्टेंबर – भारतीय मजदूर संघाने (BMS) आज मागणी केली की १७…

1 month ago

डोंबिवली नागरी सहकारी बँकेला (DNS Bank) तिसऱ्यांदा सन्मान

सचिन शिंदे  मुंबई डोंबिवली नागरी सहकारी बँकेने (DNS Bank) सहकारी बँकिंग क्षेत्रात पुन्हा एकदा आपले…

1 month ago

दादरमध्ये ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव – ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांचे कीर्तन मुख्य आकर्षण

  मुंबई (प्रतिनिधी): दादर (प.) येथील ख्यातनाम ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव यंदा भव्यदिव्य आणि…

2 months ago