तृणधान्यांचे सेवन केल्यास शरीराला उर्जा मिळेल – डॉ. उदय आणि डॉ. मधुरा कुलकर्णी यांचे प्रतिपादन
ठाणे दि.२४ :- आहारात योग्य प्रमाणात तृणधान्यांचे सेवन केल्यास त्यामुळे शरीराला उर्जा मिळेल आणि संयम, सकारात्मकता आणि प्रसन्नता वाढेल, असे प्रतिपादन आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. उदय आणि डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी येथे केले.
आपला दवाखान्याच्या माध्यमातून चार लाखांहून अधिक रुग्णांवर औषधोपचार
२०२३ हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले असून केंद्र आणि राज्य सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्यानिमित्ताने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ठाणे महापालिकेने तृणधान्यांचा प्रचार आणि प्रसिद्धीसाठी व्यापक मोहीम आखली आहे. त्याची सुरुवात महापालिका भवनातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात झाली. त्यावेळी डॉ. उदय आणि डॉ. मधुरा कुलकर्णी बोलत होते.
‘एमआयएम’ चे पहिले राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत
वाढते आजार, स्थूलता आदींवर मात करण्यासाठी तृणधान्य वापरण्यास प्राधान्य दिले पाहिजे. आहारात हळूहळू तृणधान्याचे प्रमाण वाढवत न्यावे. आपल्या शरीराला उर्जा मिळाल्याने त्याचे सकारात्मक फायदे दिसू लागतील, असेही डॉ. मधुरा यांनी सांगितले. तृणधान्यांची निवड, त्याचा वापर, त्यातून तयार होणाऱ्या विविध पाककृती, त्याचे सेवन करण्याचे साधे नियम याबाबतही डॉ. उदय आणि डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी सविस्तर माहिती दिली.