ठळक बातम्या

कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास होईल मदत- दीपक केसरकर

मॅनहटन कम्युनिटी कॉलेज समवेत करार

मुंबई दि.२१ :- मॅनहटन कम्युनिटी कॉलेजसोबतच्या करारामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण कमी खर्चात उपलब्ध होणार आहे. तसेच कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास आणि रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

बेस्ट उपक्रमात आणखी २८० वातानुकूलित बस दाखल होणार

शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत आहे. याअंतर्गत जागतिक दर्जाच्या नामांकित शिक्षण संस्थांसोबत करार करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र आणि न्यूयॉर्क येथील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क मॅनहटन कम्युनिटी कॉलेजबरोबर परस्पर शैक्षणिक सहकार्य विकसित करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक

या करारानुसार पात्र विद्यार्थ्यांना मॅनहटन कम्युनिटी कॉलेज ऑफ द सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (बीएमसीसी) मध्ये २० टक्के शुल्कात उच्च दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. या करारावर शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रनजित सिंह देओल यांनी, तर मॅनहटन कम्युनिटी कॉलेजच्या वतीने शिक्षण विभागाचे अध्यक्ष अँथनी मुनरो यांनी स्वाक्षरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *