आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा शिवजयंती उत्सव साजरा होणार
महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्थांचा पुढाकार
मुंबई दि.१६ :- आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे हा योग जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.
कान्हेरी लेणी आणि बाबुलनाथ मंदिरासाठी बेस्ट उपक्रमातर्फे विशेष बससेवा
आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’ सभागृहात ही जयंती साजरी करण्याची मागणी काही सामाजिक संस्थांनी केंद्र शासनाकडे केली होती, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या संस्थांना परवानगी नाकारल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली.
‘शब्दांगण’ उपक्रमात मोरया प्रकाशनाचे दिलीप महाजन यांची प्रकट मुलाखत
शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासन सहआयोजक असल्यास या किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्याचे निर्देश न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्व सर्वेक्षण विभागाला पत्र लिहून महाराष्ट्र शासन काही सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करणार असल्याचे कळविले आणि ही अनुमती देण्यात आली.