घर खरेदीदारांकडून आगाऊ देखभाल शुल्क घेणे बंद व्हावे – मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी
मुंबई दि.१५ :- घर खरेदीदारांकडून आगाऊ देखभाल शुल्क आकारणे ‘रेरा’ कायद्याशी विसंगत असून ही पद्धत बंद करावी, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने ‘महारेरा’चे अध्यक्ष अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. रेरा कायद्याच्या कलम ११ (४) (इ) नुसार, गृहप्रकल्पातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त सदनिकांची विक्री झाल्यावर विकासकाने घर खरेदीदार ग्राहकांची सहकारी संस्था स्थापन करण्याचे बंधन कायद्यात आहे.
बेस्ट उपक्रमातर्फे मुंबई शहर आणि उपनगरात ५५ इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग केंद्रे उभारण्यात येणार
मात्र याला न जुमानता घराचा ताबा देताना घर खरेदीदारांकडून एक वा दोन वर्षांचा इमारतीचा देखभाल खर्च विकासकाकडून आगाऊ वसूल केला जात आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक सदनिकांची विक्री झाल्यानंतर विकासकाने सहकारी संस्था स्थापन करून देण्याचे कायदेशीर बंधन पाळले तर घराचा ताबा देताना घर खरेदीदारांची सहकारी संस्था अस्तित्वात येऊ शकते.
एअर इंडिया ४७० विमाने खरेदी करणार
त्यामुळे सदनिकांचा ताबा घेतल्यावर इमारतीच्या देखभालीची जबाबदारीही घर खरेदीदारांची संस्थेवरच येते. आणि त्यांनी ती घ्यावी, असे रेरा कायद्यात अभिप्रेत आहे. आणि तरीही विकासकाकडून आगाऊ देखभाल शुल्क घेतले जाते ते अयोग्य आहे, असे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी म्हटले आहे. ५० टक्यांहून अधिक सदनिकांची विक्री होताच सहकारी संस्था स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबतही विकासकांना आदेश देण्यात यावे, अशी मागणीही मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे.