वाहतूक दळणवळण

कान्हेरी लेणी आणि बाबुलनाथ मंदिरासाठी बेस्ट उपक्रमातर्फे विशेष बससेवा

मुंबई दि.१५ :- महाशिवरात्रीनिमित्त कान्हेरी लेणी आणि बाबुलनाथ मंदिरासाठी बेस्ट उपक्रमातर्फे येत्या १८ फेब्रुवारीला विशेष बससेवा चालविण्यात येणार आहे. बोरिवली (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी आणि दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या भाविकांसाठी या बस चालविण्यात येणार आहेत.

‘शब्दांगण’ उपक्रमात मोरया प्रकाशनाचे दिलीप महाजन यांची प्रकट मुलाखत

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी या मार्गावर बसमार्ग क्रमांक १८८ ( मर्या.) च्या ६ अतिरिक्त बस फेऱ्या सकाळी १०.३० ते सायंकाळी ७. ३० दरम्यान चालविण्यात येणार आहेत.

घर खरेदीदारांकडून आगाऊ देखभाल शुल्क घेणे बंद व्हावे – मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी

बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसमार्ग क्रमांक ५७ वाळकेश्वर ते पी. टी. उद्यान – शिवडी, बसमार्ग क्रमांक ६७ वाळकेश्वर ते ॲन्टॉप हिल आणि बसमार्ग क्रमांक १०३ वाळकेश्वर ते कुलाबा बस स्थानक या मार्गांवर सकाळी ७ ते सायंकाळी ७ दरम्यान ६ अतिरिक्त बस फेऱ्या चालविण्यात येतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमातर्फे देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *