‘शब्दांगण’ उपक्रमात मोरया प्रकाशनाचे दिलीप महाजन यांची प्रकट मुलाखत
डोंबिवली दि.१५ :- ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटीच्या ‘शब्दांगण’ उपक्रमात येत्या १६ फेब्रुवारी रोजी ‘विवेकानंद केंद्रातील मंतरलेले दिवस’ या पुस्तकाचे लेखक आणि मोरया प्रकाशनचे संस्थापक दिलीप महाजन यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. हे पुस्तक विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाने प्रकाशित केले आहे.
घर खरेदीदारांकडून आगाऊ देखभाल शुल्क घेणे बंद व्हावे – मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी
‘कॉर्पोरेट दिंडी’ पुस्तकाचे लेखक माधव जोशी ही मुलाखत घेणार असून मुलाखतीचा हा कार्यक्रम ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होणार आहे. ध्रुव आय. ए. एस. अकॅडमी बी- २०४, वैभव बिल्डिंग, कस्तुरी प्लाझा समोर, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व) येथे रात्री सव्वा आठ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. https://www.youtube.com/live/jMx02yCrIZo?feature=share या लिंकवर हा कार्यक्रम थेट प्रसारित करण्यात येणार आहे.