ठळक बातम्या

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस

मुंबई दि.१२ :- देशभरातील १३ राज्यांमध्ये आज फेरबदल झाले असून झारखंडचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त करून काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता.

सीमा शुल्क विभागाकडून मुंबईत १८ किलो सोने जप्त

अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला. बैस यांचा अल्पपरिचय बैस यांचा जन्म छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झाला आहे. तब्बल सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेले बैस हे देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.

केंद्रीय औषध मानक नियंत्रक संस्थेतर्फे ऑनलाइन औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस

२०१९ मध्ये त्यांना लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून बैस यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्रिपुरात दोन वर्ष राज्यपाल म्हणून काम पाहिल्यानंतर २०२१ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *