शहरांचे नाव बदलण्यापूर्वी सूचना, हरकती मागविण्यात आल्या होत्या का? – मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
मुंबई दि.०१ :- औरंगाबाद या शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव असे करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या का? कायद्याच्या कोणत्या तरतुदींच्या आधारे तसा निर्णय घेण्यात आला,’ असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला विचारला.
घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावर आजपासून १८ जादा फेऱ्या
‘राज्य सरकारचे याबाबतचे प्रस्ताव मिळाले का? आणि त्याबाबत सद्यस्थिती काय आहे? अशी विचारणा प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारलाही केली. राज्य आणि केंद्र सरकाने याबाबत येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर द्यावे, असे खंडपीठाकडून सांगण्यात आले.