Thursday, January 15, 2026
Latest:
ठळक बातम्या

बचतगटांच्या माध्यमातून उत्कृष्ट काम सुरू – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

मुंबई दि.०१ :- बचतगटांच्या माध्यमातून महिला उत्कृष्ट काम करत असून देशाच्या प्रगतीसाठी महिलांचे योगदान आणि सहभाग अत्यंत आवश्यक आहे, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) राबवित असलेल्या नव तेजस्विनी ‘जेंडर ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझमच्या अंमलबजावणी उपक्रमाच्या राजभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी बोलत होते.

‘ललिता शिवाजी बाबर’ चित्रपटाच्या टीझरचे अनावरण

इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट आणि बिल ॲण्ड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्या माध्यमातून राज्यात राबविण्यात येणारा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम महिला आर्थिक विकास महामंडळ उत्कृष्टपणे राबवेल, असेही राज्यपालांनी सांगितले. ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझम आयफॅडच्या विशेषतज्ञ नदिया बेल्टचिका म्हणाल्या, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंटचे ग्राम विकासामध्ये खूप मोठे योगदान आहे.

नव्या उद्योगांसाठी परवानगी प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय

‘जी. टी. एम्.’ साठी निवड करण्यात आलेल्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश आहे. इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट आणि बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने जी. टी. एम. या उपक्रमासाठी सहा वर्षासाठी ४० कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *