‘यूटीएस’ अॅपवरून तिकीट काढण्याऱ्या प्रवाशांची संख्या १ कोटी ३५ लाखांवर
मुंबई दि.३० :- मध्य रेल्वेवर मुंबई विभागात यूटीएस अॅपवरून तिकीट काढण्या-या प्रवाशांची संख्या वाढली असून डिसेंबर २०२२अखेर ही प्रवासी संख्या १ कोटी ३५ लाखांपर्यंत पोहोचली आहे.
मालाड येथील एका उद्यानाला दिलेले ‘टिपू सुलतान’ नाव काढून टाकण्याचे आदेश
जानेवारी २०२२मध्ये यूटीएस अॅपवरून तिकीट काढण्याऱ्या प्रवाशांची संख्या ३७ लाख १४ हजार इतकी होती. तिकिटांसह सर्व पास नूतनीकरण, नवा पास काढणे अशा खरेदीतही मोठी वाढ झाली आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविकांचे २० फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन
प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित लोकलची एकाच वेळी कमाल तिकिटे उपलब्ध होणे, पासची वैधता त्याच दिवसांपासून मिळणे यामुळे यूटीएसला प्रवाशांची पसंती मिळत असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.