ठळक बातम्या

‘डी’ कंपनीच्या इशार्‍यावर काम करणार्‍या बॉलीवूडचे हिंदूविरोधी षड्यंत्र उद्ध्वस्त केले पाहिजे

मेजर (सेवानिवृत्त) सरस त्रिपाठी यांचे प्रतिपादन

मुंबई दि.३० :- ‘डी’ कंपनीच्या इशार्‍यावर काम करणार्‍या बॉलीवूडचे हिंदूविरोधी षड्यंत्र उद्ध्वस्त केले पाहिजे, असे प्रतिपादन दिल्ली येथील मेजर (सेवानिवृत्त) तथा लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सरस त्रिपाठी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बॉलीवूड’चे पाकिस्तान प्रेम – पठाण’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होेते.

आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांना धक्का

भारताच्या ‘संशोधन आणि विश्लेषण शाखे’च्या अर्थात ‘रॉ’च्या अधिकार्‍याने पाकच्या ‘आय्.एस्.आय्.’ अधिकार्‍याचे साहाय्य घेतले, असे उदाहरण आतापर्यंत ऐकले नाही. व्यावहारिकदृष्ट्या ते पटत नाही, असे स्पष्ट करून त्रिपाठी म्हणाले, पठाण चित्रपटात ‘रॉ’ अधिकार्‍यांविषयी घृणा निर्माण करून ‘आय.एस.आय.’ अधिकारी आणि पठाणांविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा भ्रामक प्रचार केला आहे.

जेट एअरवेज कंपनीची चार बोईंग विमाने सील

बॉलीवूड पूर्वीपासूनच हिंदु पुजारी, साधुसंत तसेच ‘हिंदू’ म्हणून ओळख असलेल्या पात्रांना खलनायक म्हणूनच दाखवत आलेली आहे. हा एक षड्यंत्राचा भाग असून बॉलीवूड ‘डी’ कंपनीच्या इशार्‍यावर काम करत आहे. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक अभय वर्तक म्हणाले, पठाण चित्रपट दाखविणारी भारतातील विविध शहरांतील सिनेमागृहे ओस पडली आहेत, असे समाज माध्यमांतून स्पष्ट होत आहे. तरीसुद्धा शाहरुख खानच्या ‘पी.आर्. एजन्सी’द्वारा ‘पठाण चित्रपट सर्वत्र ‘हाऊसफुल’ झाला आहे’, असा खोटा प्रचार केला जात आहे. ‘बॉलीवूडचा हा ‘बेशरम रंग’ ओळखण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *