मालाड येथील एका उद्यानाला दिलेले ‘टिपू सुलतान’ नाव काढून टाकण्याचे आदेश
मुंबई दि.३० :- मालाड येथील एका उद्यानाला महाविकास आघाडी सरकारच्या काळात देण्यात आलेले ‘टिपू सुलतान’ हे नाव काढून टाकण्याचे आदेश मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.
राज्यातील अंगणवाडी सेविकांचे २० फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गोपाळ शेट्टी यांनी केलेल्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला होता. शेट्टी यांच्या या मागणीला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक सदस्यांनी पाठिंबा दर्शविल्याने हे नाव काढून टाकण्याची सूचना लोढा यांनी केली.
महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
हे नाव बदलण्यासाठी स्थानिक नागरिकांसह इतर अनेक संघटनांनी आंदोलनदेखील केले होते. याबाबची कार्यवाही सुरू करण्यात आली असून लवकरात लवकर सर्व प्रक्रिया पूर्ण करून नवे नाव देण्यात येईल, अशी माहिती लोढा यांनी दिली.