महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई दि.३० :- महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मिरा-भाईंदरच्या प्रारूप विकास आराखड्यावर येत्या ८ फेब्रुवारीपासून सुनावणी
राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणसदृश परिस्थिती तयार झाली आहे. रविवारी सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ हवामानाची नोंद झाली.
‘डी’ कंपनीच्या इशार्यावर काम करणार्या बॉलीवूडचे हिंदूविरोधी षड्यंत्र उद्ध्वस्त केले पाहिजे
नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबादसह आजूबाजूच्या जिल्ह्यांतील काही भागांत विजांच्या कडकडाटासह, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.