मिरा-भाईंदरच्या प्रारूप विकास आराखड्यावर येत्या ८ फेब्रुवारीपासून सुनावणी
ठाणे दि.३० :- मिरा-भाईंदरच्या प्रारूप विकास आराखड्यावर येत्या ८ फेब्रुवारीपासून सुनावणीला सुरुवात होणार असून मिरा-भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयात ही सुनावणी घेण्यात येणार आहे. नगररचना विभागाच्या कोकण विभाग सहसंचालकांनी नेमलेली समिती सुनावणी घेण्यासाठी उपस्थित रहाणार आहे.
आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांना धक्का
सुनावणीचा पहिला टप्पा ८ व ९ फेब्रुवारीला होणार असून स्थायी समितीच्या सभागृहात सकाळी अकरा वाजल्यापासून सुनावणीआ सुरुवात होणार आहे. या समितीमध्ये नगररचना विभागाचे एक निवृत्त सहसंचालक, एक निवृत्त सहायक संचालक, एक पर्यावरण प्लानर व स्वत: आराखडा तयार करणारे ठाणे नगररचना विभागाचे विद्यमान सहायक संचालक यांचा समावेश आहे.
‘डी’ कंपनीच्या इशार्यावर काम करणार्या बॉलीवूडचे हिंदूविरोधी षड्यंत्र उद्ध्वस्त केले पाहिजे
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मिरा-भाईंदर शहराचा प्रारूप विकास आराखडा ठाणे नगररचना विभागाने प्रसिद्ध केला होता. त्यावर तीन हजाराहून अधिक हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. आता या हरकतींवर ठाणे नगररचना विभागाकडून सुनावणी आयोजित करण्यात आली आहे.