मुंबईत दोन दिवस थंडीचे
मुंबई दि.२९ :- मुंबईत पुढील दोन दिवस तापमानाचा पारा घसरणार असून थंडीचा कडाका वाढणार आहे. पुढचे दोन दिवस मुंबईच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. मुंबईसह नाशिक आणि उत्तर भागात काही प्रमाणात थंडी जाणविणार आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणूक प्रचार आज संपला
जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात मुंबईत चांगलाच गारवा होता. मात्र उत्तरेकडच्या शीत वाऱ्यांची जागा पूर्वीय आणि आग्नेय उबदार वाऱ्यांनी घेतल्यामुळे मुंबईचे तापमान वाढले होते. आज (रविवार) संध्याकाळपासून तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.
