घरांच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी म्हाडाकडून येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई दि.२७ :-‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाने गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना घरांच्या अर्जांमध्ये आवश्यक ती दुरुस्ती करण्यासाठी आता आणखी मुदतवाढ दिली आहे. येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत अर्जात दुरुस्ती करता येणार आहे.
उर्फी जावेद विचारतेय, कुणी घर देता का घर
अर्जात दुरुस्ती करण्यासाठी याआधीही मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र या मुदतीत गिरणी कामगार वा त्यांचे वारस पुढे न आल्यामुळे नवा पेच निर्माण झाला.
ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घ्यायला ठाण्यात येणार- उद्धव ठाकरे
परिणामी मुंबई मंडळाने अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना अखेरची मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत दुरुस्ती न केल्यास संबंधितांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही मंडळाने निवेदनात म्हटले आहे.