स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाला विभाजनकारी तत्त्वांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली- अनिलकुमार मिश्रा
मुंबई दि.२६ :- आपल्या देशाला एक सांस्कृतिक इतिहास असून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विभाजनकारी तत्त्वांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली, असे प्रतिपादन मुंबई विभागाचे आयकर आयुक्त अनिल कुमार मिश्रा यांनी येथे केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी ध्वजवंदन
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विशेष अतिथी म्हणून न्यूज १८ लोकमतचे संपादक आशुतोष पाटील उपस्थित होते. स्मारकाचे अन्य पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.
मराठी भाषेचा मधुर स्वाद नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा – राज्यपाल कोश्यारी
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे ७४ व्या भारतीय प्रजासत्ताकदिन समारंभात उपस्थित स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर, स्मारक सदस्य के. सरस्वती, दीपक कानुलकर, डॉ. अनिल नाबर तसेच मुंबई विभागाचे आयकर आयुक्त अनिल कुमार मिस्रा, न्यूज १८ लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांच्यासमवेत.