गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक यांच्या समाधी परिसरात ‘स्वराज्यभूमी’ नामफलक नाही
मुंबई दि.२५ :- गिरगाव चौपाटीवरीललोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या समाधीस्थान परिसराला स्वराज्यभूमी नाव देण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी अद्याप स्वराज्यभूमी नामफलक बसविण्यात आलेला नाही.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त; शिवाजी पार्क परिसरात ‘नो फ्लाय झोन’
लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे गिरगाव चौपाटीचे स्वराज्यभूमी असे नामकरण करण्यात आले. मात्र, हे नामकरण केवळ कागदोपत्री झाले असून प्रत्यक्ष समाधी स्थळावर स्वराज्यभूमी नामफलक बसविण्यात आलेला नाही, असे समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सिलम यांनी सांगितले.
रत्नागिरी येथे येत्या एप्रिल महिन्यात राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे समेलन
या ठिकाणी लोकमान्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचे चित्रशिल्परुपी स्मारक, टिळकांच्या जयंती-पुण्यतिथीदिनी शासकीय सन्मान, ध्वजस्तंभ उभारण्याची मागणी समितीकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र त्याकडेही दुर्लक्ष झाल्याचे सिलम यांचे म्हणणे आहे.