महापालिकेतर्फे भांडूप येथे नव्या रुग्णालयाची उभारणी
मुंबई दि.१९ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, शीव रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे भांडुप येथे ३६० रुग्ण शय्यांचे रुग्णालय उभारले जाणार आहे. तसेच गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयाचा पुनर्विकास होणार असून ओशिवरा येथे १५२ रुग्णशय्यांचे प्रसूतिगृह उभारले जाणार आहे.
फक्त निलंबन नको, अशा उमेदवारांना निवडणूक लढवायला बंदी करा, नाहीतर पाडा
रुग्णालयात प्रस्तावित करण्यात आलेल्या ३६० खाटांपैकी १९० रुग्शय्या वैद्यकीय शल्यचिकित्सा, स्त्रीरोग, प्रसूति, ट्रॉमा, बालरोग, नवजात शिशू, कान-नाक-घसा, नेत्ररोग व अपघात यासाठी असतील.
ठाणे येथे चार दिवसांचा संस्कृती कला महोत्सव
३० अतिदक्षता रुग्शय्या या वैद्यकीय, नवजात शिशू, अपघाती रुग्ण यांच्याकरिता असणार आहेत. १०० अतिविशेष सर्वसाधारण रुग्णशय्या न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, कर्करोग व पोटाचे विकार यासाठी असणार आहेत. तर उर्वरित ४० खाटा ‘अतिविशेष अतिदक्षता’ यासाठी असणार आहेत.