ठळक बातम्या

बृहन्मुंबई महापालिकेतर्फे नागरिकांच्या रक्तदाबाची चाचणी

मुंबई दि.१९ :- बृहन्मुंबई महापालिकेने नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची रक्तदाबाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ४ जानेवारीपासून दर बुधवारी ‘आशा’ सेविका किंवा आरोग्य सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत.

मॉडेलचे आक्षेपार्ह छायाचित्र व्हायरल केल्याप्रकरणी अभिनेत्री राखी सावंतला अटक

आतापर्यंत २१ हजार ४८२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून यापैकी ३० वर्षांवरील ३२ हजार ४२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी ४ हजार ४३६ नागरिकांना उच्च रक्तदाब असल्याचे आढळून आले. तर उच्च रक्तदाबाचे दोन हजार २४७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *