उपनगरीय गाडीतील घुसखोरांच्या विरोधात पश्चिम रेल्वेची कारवाई, तीन लाखांहून अधिक दंड वसूल
मुंबई दि.१७ :- उपनगरीय गाडीतील महिला, अपंगांच्या राखीव डब्यात घुसखोरी करणा-या प्रवाशांच्या विरोधात पश्चिम रेल्वेने केलेल्या कारवाईत ५३ हजार घुसखोर प्रवाशांकडून तीन लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
तिकीट तपासनीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) डिसेंबर २०२२ मध्ये विशेष कारवाई मोहीम राबविली होती. या कारवाईत तब्बल २ हजार ८३५ जणांना पकडण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची ईडीकडून चौकशी
पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने तृतीयपंथीयांविरोधातही कारवाई केली. राखीव डब्यात प्रवेश, तसेच त्रास दिल्याप्रकरणी प्रवाशांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ३४८ तृतीयपंथीयांविरोधात कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख १६ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.