मुंबईतही तापमानाचा पारा घसरला या ऋततुतील सर्वात कमी तापमानाची नोंद
मुंबई दि.१६ :- मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा खाली घसरला असून थंडी वाढू लागली आहे. रविवारी पहाटे सांताक्रूझ येथे तापमानाचा पारा १३.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला तर कुलाबा येथे १६.२ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. रविवारी या ऋतुतील सर्वात कमी तापमान होते.
सावरकर तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी सुवर्ण, रजत, कांस्य पदके मिळविली
मुंबईत कुलाबा केंद्रावरील नोंदीनुसार शनिवारपेक्षा रविवारचा किमान तापमानाचा पारा १.२ अंशांनी तर सांताक्रूझ केंद्रावरील पारा १.४ अंशांनी खाली उतरला. मुंबईतील थंडीमुळे प्रदूषण पातळीत रविवारी वाढ झाली असून निर्देशांक वाईट होता. मुंबईचा प्रदूषण निर्देशांक २९० ते ३००च्या दरम्यान होता. वांद्रे कुर्ला संकुल, चेंबूर, अंधेरी येथे प्रदूषण निर्देशांक अती वाईट असा नोंदविला गेला.
टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मकरोत्सवाचे आयोजन
नवी मुंबईचा प्रदूषण निर्देशांकही अती वाईट होता. तर कुलाबा, माझगाव येथे प्रदूषण निर्देशांक वाईट होता. मुंबईच्या तीन केंद्रांवर हवेची गुणवत्ता अतिवाईट असल्याने मुंबईच्या एकूण हवेचा गुणवत्ता निर्देशांकही त्याच पातळीकडे झुकणारा होता. मुंबईची हवा पुढील दोन दिवस वाईट असण्याची शक्यता आहे.