मेट्रो ३ प्रकल्पासाठी बंद करण्यात आलेले माहीम-धारावी परिसरातील रस्ते पूर्ववत
मुंबई दि.१६ :- ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ मेट्रो-३ या भूमिगत प्रकल्पासाठी माहीम-धारावी परिसरातील बंद करण्यात आलेले रस्ते आता पूर्ववत करण्यात आले आहेत. ही मार्गिका पूर्ण होत असल्याने हे रस्ते पूर्ववत केले जात आहेत.
मुंबईतही तापमानाचा पारा घसरला या ऋततुतील सर्वात कमी तापमानाची नोंद
मेट्रो-३ ही एकूण सात टप्प्यात असून त्यासाठी सप्टेंबर २०१६ पासून रस्ते बंद करण्यास सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यातील रस्ते गेल्या वर्षापासून मोकळे करण्यास सुरुवात झाली. सर्व रस्ते जून २०२४पर्यंत पूर्ववत होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
सावरकर तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी सुवर्ण, रजत, कांस्य पदके मिळविली
जून २०२४ मध्ये टप्पा २ मधील अखेरचा रस्ता पूर्ववत केला जाणार आहे. मेट्रो ३नुसार, धारावी स्थानक व माहीम या परिसरातील रस्ता डिसेंबर २०२२पासून पूर्ववत करण्यास सुरूवात झाली. हे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.