महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची ईडीकडून चौकशी
मुंबई दि.१६ :- करोना काळात उभारण्यात आलेल्या वैद्यकीय केंद्र कथित घोटाळ्या प्रकरणी बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सोमवारी सुमारे चार तास चौकशी करण्यात आली.
मेट्रो ३ प्रकल्पासाठी बंद करण्यात आलेले माहीम-धारावी परिसरातील रस्ते पूर्ववत
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर ईडीकडून चहल यांना नोटीस बजाविण्यात येऊन त्यांना सोमवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार चहल सोमवारी ईडी कार्यलयात हजर झाले.
मुंबईतही तापमानाचा पारा घसरला या ऋततुतील सर्वात कमी तापमानाची नोंद
करोना काळात मुंबईत जम्बो करोना केंद्रे सुरू करण्यासाठी विविध कंपन्यांना वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. एका कंपनीला कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना कंत्राट देण्यात आले, तसेच कंत्राट मिळविण्यासाठी या कंपनीने महापालिकेकडे बनावट कागदपत्रे सादर केली असल्याचा आरोप आहे.