मुंबईत अंड्याच्या दरांत वाढ
मुंबई दि.१६ :- थंडीचा कडाका वाढल्याने मुंबईत अंड्याच्या दरांत वाढ झाली आहे. थंडीच्या कडाक्यामुळे अंड्यांच्या दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. हिवाळ्याच्या दिवसांत अंड्यांच्या दरात वाढ होते.
महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची ईडीकडून चौकशी
अंधेरी लोखंडवाला आणि वांद्रे येथे शनिवारी एक डझन अंड्याचा दर ९० रुपये होता. तर बोरिवली, दादर, कुर्ला येथे हा दर ८४ रुपये प्रति डझन तर शीव ,विक्रोळी, कांदिवलीत अंड्यांचा डझनाचा दर ७८ ते ८० रुपयांच्या दरम्यान होता.