मुंबई आसपास संक्षिप्त
‘वाळवी’च्या चमूने दिले रस्ता सुरक्षेचे धडे
ठाणे दि.१६ :-‘वाळवी’ चित्रपटाच्या चमूने ठाण्यात आयोजित ३३ व्या रस्ता सुरक्षितता सप्ताहात हजेरी लावली. स्पप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे हे कलाकार या वेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बाईक रॅलीचेही उदघाटन करण्यात आले.
सावरकर तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी सुवर्ण, रजत, कांस्य पदके मिळविली
ठाणे-बोरिवली दरम्यान भूमिगत मार्ग- निविदा जारी
मुंबई दि.१६ – ठाणे-बोरिवली भूमीगत मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने निविदा जारी केल्या आहेत.
टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मकरोत्सवाचे आयोजन
पतंगाच्या मांजाने अनेक पक्षी जखमी
मुंबई दि.१६ :- मकर संक्रांतीनिमित्त रविवारी मुंबईमध्ये पतंग उडविण्यासाठी वापरण्यात आलेला मांजा अनेक पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरला आहे. घारी, घुबडे, कोकिळा असे पक्षी जखमी झाले. मात्र, यात कबुतरांची संख्या सर्वाधिक आहे. पतंगाच्या मांज्यामुळे जखमी झालेल्या ५७ कबुतरांवर उपचार करून त्यांना कबुतरखान्यात सोडण्यात आले.
छोटा राजन वाढदिवस; उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नवी मुंबई संपर्क प्रमुखाला अटक
गिरण्यांच्या जमिनीवरील ११ चाळींचा पुनर्विकास
मुंबई दि.१६ :- राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) मुंबईतील नऊ गिरण्यांच्या जमिनीवरील ११ चाळींचा ‘म्हाडा’मार्फत जलदगतीने पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली असून, उपकरप्राप्त नसलेल्या इमारतींना उपकरप्राप्त (सेस) म्हणून रुपांतरीत करण्याची सूचना ‘एनटीसी’ने राज्य सरकारला केली असल्याची माहिती केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. त्यामुळे या चाळींतील १ हजार ८९२ मराठी कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टचा प्रवास आता एकाच तिकीटात
उड्डाणपूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन
टिटवाळा दि.१६ :- टिटवाळा रेल्वे स्थानकातील रेल्वे फाटकावरील उड्डाण पुलाचे काम येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे. या पुलाच्या टिटवाळा पूर्व, पश्चिम आणि आंबिवलीकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्यांच्या कामांना कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे.