सावरकर तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी सुवर्ण, रजत, कांस्य पदके मिळविली
मुंबई दि.१५ :- अहमदनगर येथे शनिवारी झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय तायक्वांडो पुमसे स्पर्धेमध्ये सावरकर तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी भरघोस पदके पटकाविली. एकेरी गटात ३ सुवर्णपदके, एक रजत पदक, ५ कांस्य पदके तसेच दुहेरी गटात ३ सुवर्णपदके, १ रजत पदक आणि सांघिक गटात ५ सुवर्णपदकांचा समावेश आहे.
टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मकरोत्सवाचे आयोजन
अकादमीचे प्रशिक्षक राजेश खिलारी यांनी दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. अकादमीच्या खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.