टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मकरोत्सवाचे आयोजन
डोंबिवली दि.१५ :- टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे येत्या २६ ते २९ जानेवारी दरम्यान ‘मकरोत्सव – २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. २६ जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता ‘ ए वर्ल्ड विदाऊट वॉर’ पुस्तकाचे लेखक आणि माजी डोंबिवलीकर संदीप वासलेकर यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
छोटा राजन वाढदिवस; उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नवी मुंबई संपर्क प्रमुखाला अटक
ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर वासलेकर यांच्याशी संवाद साधणार आहेत. २७ जानेवारी या दिवशी संध्याकाळी सात वाजता समीर लिमये यांचा ‘कॉर्पोरेट कीर्तन’ हा कार्यक्रम होणार असून ‘श्री समर्थांचे मनाचे श्लोक’ या पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे. २८ जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता रघुलीला एंटरप्रायझेस निर्मित ‘सप्तसूर झंकारित बोले’ हा कार्यक्रम होणार आहे.
मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टचा प्रवास आता एकाच तिकीटात
याची निर्मिती संकल्पना आदित्य बिवलकर यांची असून कार्यक्रमात केतकी चैतन्य , धनंजय म्हसकर , निमिष कैकाडी , ओंकार प्रभुघाटे, प्राजक्ता काकतकर हे गायक नाट्यपदे सादर करणार आहेत. त्यांना धनंजय पुराणिक (तबला) , निरंजन लेले (संवादिनी) संगीतसाथ करणार असून निवेदन अनघा मोडक यांचे आहे.
बृहन्मुंबई महापालिका आयुक्त चहल यांना ईडीचे समन्स, सोमवारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
मकरोत्सवाची सांगता २९ जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता ‘मेरी आवाजही ही पहेचान है’ या कार्यक्रमाने होणार आहे. भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांनी हिंदी चित्रपटांसाठी शास्त्रीय संगीतावर आधारित गायलेली गाणी सादर होणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना आणि निवेदन कौशल इनामदार यांचे तर संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे आहे.
उपराष्ट्रपती धनखड मुंबई भेटीवर
मधुरा कुंभार, शरयू दाते, सुस्मिरता डवालकर हे गायक ही गाणी सादर करणार असून त्यांना आर्चिस लेले (तबला) अरविंद करंजावकर (ढोलक), कृष्णा (ढोलकी), अमोघ दांडेकर (गिटार), दिनेश भोसले (मेंडोलीन), अमर ओक (बासरी), अमित गोठिवरेकर, दिप वझे ( की बोर्ड) हे संगीतसाथ करणार आहेत. टिळकनगर विद्या मंदिर शाळेचे पटांगण, डोंबिवली पूर्व येथे हे सर्व कार्यक्रम होणार असून कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश आहे.