छोटा राजन वाढदिवस; उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नवी मुंबई संपर्क प्रमुखाला अटक
मुंबई दि.१५ :- कारागृहात असलेल्या कुख्यात छोटा राजनच्या वाढदिवस छायाचित्र प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी वाढदिवस साजरा करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नवी मुंबई संपर्कप्रमुख निलेश (आप्पा) पराडकर यांच्याविरोधात गुन्हा केला आणि शनिवारी रात्री त्यांना अटक केली.
मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टचा प्रवास आता एकाच तिकीटात
छोटा राजनचा १३ जानेवारीला वाढदिवस होता. चेंबूरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नवी मुंबईचे संपर्कप्रमुख निलेश (आप्पा) पराडकर यांनी छोटा राजन याचे छायाचित्र असलेला केक कापून वाढदिवस साजरा केला. समाजमाध्यमांवर या वाढदिवसाची छायाचित्रे प्रसारीत झाल्यानंतर टिळकनगर पोलिसांनी सामाजिक शांतता भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.