बृहन्मुंबई महापालिका आयुक्त चहल यांना ईडीचे समन्स, सोमवारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
मुंबई दि.१४ :- करोना उपचार केंद्र कंत्राट गैरव्यवहारप्रकरणी बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी समन्स बजाविले. संबंधित कागदपत्रांसह सोमवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहावे, असे ‘ईडी’ने या समन्समध्ये म्हटले आहे.
उपराष्ट्रपती धनखड मुंबई भेटीवर
भाजपनेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यात करोना केंद्रात सेवा पुरविण्याच्या कंत्राटात कंपनीने गैरव्यवहारातून महापालिकेकडून ३८ कोटी रुपये मिळविल्याचा आरोप त्यांनी केला होता.
भ्रमणध्वनी अॅप आधारित वाहतूक सेवांचे धोरण ठरविण्यासाठी समितीची स्थापना, तीन महिन्यात अहवाल देणार
हे प्रकरण सन २०२२ च्या ऑक्टोबरमध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. त्यापूर्वी सोमय्या यांनी याप्रकरणी मार्च २०२२ मध्ये न्यायालयात अर्ज केला होता. त्यात त्यांनी १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार असल्याचा दावा केला होता.