‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात अक्षय केळकर विजेता
मुंबई दि.०९ :- कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ च्या चौथ्या पर्वात अभिनेता अक्षय केळकर विजेता ठरला. या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रविवारी पार पडला. ‘बिग बॉस’चा चषक आणि १५ लाख ५५ हजार रुपये त्याला बक्षिस म्हणून देण्यात आले.
मुंबई विमानतळावर ७५ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त
या महाअंतिम सोहळ्यात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर उपविजेती ठरली. यंदाच्या वर्षी ‘बिग बॉस’मध्ये अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने, अमृता धोंगडे हे टॉप ५ स्पर्धक ठरले. राखी सावंत ९ लाख रुपये घेऊन ‘बिग बॉस’च्या स्पर्धेतून बाहेर पडली.
खुल्या बालचित्रकला स्पर्धेत ७७ हज़ार ४५३ विद्यार्थ्यांचा सहभाग
त्यापाठोपाठ अमृता धोंगडेंनीही बाहेर पडली. त्यानंतर अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, किरण माने हे तिघेजण उरले. नंतर किरण माने घराबाहेर पडले. अखेर अपूर्वा आणि अक्षय या दोघांमधून अक्षय केळकरची विजेता म्हणून निवड झाली.