समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन, १२ लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल
मुंबई दि.८ :- जानेवारी समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या सुरू झालेल्या टप्प्यात वाहनचालक वेगमर्यादेच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले आहे. ११ डिसेंबर ते २ जानेवारी या काळात वेगमर्यादा ओलांडण्याच्या ६१३ घटना घडल्या. या प्रकरणी चालकांकडून १२ लाख २६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
खड्डा चुकविण्याच्या नादात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चार जखमी
या महामार्गावर अवजड वाहनांसाठी ताशी ८० किलोमीटर आणि हलक्या वाहनांसाठी ताशी १२० किलोमीटर वेगमर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र असे असताना अनेक वाहनचालक वेगमर्यादेचेपालन करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सीटबेल्ट न लावल्यामुळे ७८, तर परवानगी नसतानाही वाहन उभे करणे तसेच अन्य कारणांमुळे १७३ जणांना दंड करण्यात आला.