खड्डा चुकविण्याच्या नादात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चार जखमी
मुंबई दि.०८ :- खड्डा चुकविण्याच्या नादात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी मंदिरासमोरील पुलावर रविवारी हा अपघात झाला.
भिवंडी येथे तीन बोगस डॉक्टरांना अटक
दीपेश नरोत्तम राठोड (३५), तेजल दीपेश राठोड (३२), मधु नरोत्तम राठोड (५८), स्नेहल दीपेश राठोड (अडीच वर्षे) हे अपघामध्ये जखमी झाले तर नरोत्तम छना राठोड (६५), केतन नरोत्तम राठोड (३२), आर्वी दीपेश राठोड (एक वर्ष) यांचा मृत्यू झाला. नालासोपारा पश्चिम येथील राठोड कुटुंबीय गुजरातच्या दिशेने निघाले होते.
पुढील दोन दिवस मुंबईची हवा अतिधोकादायक पातळीवर
राष्ट्रीय महामार्गाच्या गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खड्डा चुकविताना वाहन चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनावरील ताबा सुटल्याने ती पुढे एका कंटेनवर जाऊन आदळली. जखमींवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.