मुंबई विमानतळावर ७५ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त
मुंबई दि.०८ :- मुंबई विमानतळावर ७५ कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त करण्यात सीमाशुल्क विभागाला यश आले आहे. तीन विविध कारवायांमध्ये सुमारे साडेचार किलो कोकेन व साडेचार किलो हेरॉईन जप्त करण्यात आले.
खड्डा चुकविण्याच्या नादात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चार जखमी
आफ्रिकी देशांमधून या अंमलीपदार्थांची तस्करी करण्यात आली होती. सीमाशुल्क विभागाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर शुक्रवारी सुमारे २८ कोटी रुपये किंमतीचे तीन किलो कोकेन जप्त केले. याप्रकरणी उत्तराखंडमधील रहिवाशाला अटक करण्यात आली आहे.