जलवाहिन्यांमधील गळती थांबविण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न
मुंबई दि.०७ :- मुंबईच्या पूर्व उपनगरातील देवनार, गोवंडी, मानखुर्द या भागातील जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती थांबविण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे उद्या बालचित्रकला स्पर्धा
याचा एक भाग म्हणूनच दुषित पाणीपुरवठा थांबविणे आणि जलवाहिन्यांशी संबंधित इतर कामे करण्यासाठी महापालिकेने पुढील दोन वर्षांसाठी कंत्राटदार नेमण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे.
पुढील दोन दिवस मुंबईची हवा अतिधोकादायक पातळीवर
या कामांसाठी १४ कोटी रुपये खर्च येणार असून कामासाठी दिलेल्या कंत्राटाची मुदत ऑगस्ट महिन्यात संपुष्टात आली आहे. त्यामुळे नवीन कंत्राटदाराच्या नियुक्तीसाठी महानगरपालिकेने निविदा मागविल्या होत्या. निविदा प्रक्रियेअंती या कामांसाठी एका कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे.