अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी
मुंबई दि.०७ :- अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्या घरी चोरी झाली आहे. घरातील साडेचार लाख रुपये किमतीचे मनगटी घड्याळ चोरीला गेल्याची तक्रार क्रांतीने गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
पुढील दोन दिवस मुंबईची हवा अतिधोकादायक पातळीवर
घरकाम करणाऱ्या मोलकरीणीने ही चोरी केली असावी असा संशय क्रांती यांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे. क्रांती रेडकरच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीची नेमणूक एका एजन्सीमार्फत करण्यात आली होती.
भिवंडी येथे तीन बोगस डॉक्टरांना अटक
या घटनेनंतर ती मोलकरीण पसार झाली आहे. गोरेगाव पोलीस त्या मोलकरणीला नोकरीवर देणा-या एजन्सीचा तसेच त्या मोलकरणीचा शोध घेत आहेत.