देशांतर्गत विमान प्रवाशांमध्ये वाढ
मुंबई दि.०६ :- देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण वाढले असून डिसेंबर महिन्यात प्रवाशांची संख्या १२९ लाख इतकी नोंदली गेली. या वर्षात प्रवाशांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली तरीही हवाई इंधनाच्या वाढत्या दरांचा परिणाम प्रवासी संख्येवर होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.