बाळासाहेबांची शिवसेना आणि कवाडे यांचा रिपब्लिकन पक्ष यांच्यात युती
मुंबई दि.०४ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष यांच्यात युती झाली आहे.
मुख्यमंत्री शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे यांनी बुधवारी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.