राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डोंबिवलीतील पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शन सोहळ्याचे निमंत्रण
डोंबिवली २५ :- डिसेंबर डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे येत्या २० ते २९ जानेवारी २०२३ या कालावधीत डोंबिवलीत बहुभाषीक पुस्तक आदान प्रदान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पै फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै, श्री गणेश मंदिर संस्थानचे कार्यवाह प्रवीण दुधे, दिपाली काळे यांनी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली. आणि पै फ्रेंड्स लायब्ररी व समस्त डोंबिवलीकरांतर्फे त्यांना पुस्तक आदान प्रदान सोहळा २०२३ चे निमंत्रण देण्यात आले. कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा समजून घेतल्यानंतर आगामी काळातील महाराष्ट्र दौऱ्यात पुस्तक आदान प्रदान सोहळ्यास भेट देण्याचे आश्वासन राष्ट्रपती मूर्मु यांनी दिले.