अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर हिंदी चित्रपट
चित्रपटाचे पोस्टर समाज माध्यमांवर प्रसारित
मुंबई दि.२५ :- माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे नेते दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मै अटल हू’ हा हिंदी चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मराठीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांनी केले आहे.
वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जाधव यांनी आज या चित्रपटाचे पोस्टर समाज माध्यमांवर प्रसारित केले आहे. या चित्रपटात अभिनेते पंकज त्रिपाठी अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहेत.विनोद भानुशाली, संदीप सिंग यांनी या स चित्रपटाची निर्मिती केली आहे.