ठळक बातम्या

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या

सहकारी अभिनेता शिझान खान याला चार दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई दि.२५ :- अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तुनिषाचा सहकारी अभिनेता शिझान खान याला शनिवारी रात्री अटक केली. शिजानला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणा-या तुनिषा शर्मा या अभिनेत्रींने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. मालिकेचे चित्रीकरण सुरू असलेल्या स्टुडिओतच तुनिषाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला.

तुनिषाचे अभिनेता शिझान याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्याने प्रेमसंबंध तोडल्याने ती निराश झाली होती. दोन दिवसांपासून ती नैराश्यात होती, अशी तक्रार तुनिषाच्या आईने दिली होती. त्या तक्रारीवरून शिझानच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *