ठळक बातम्या

‘आयआयटी’ मुंबईच्या २५ विद्यार्थ्यांना वार्षिक १ कोटींहून अधिक वेतन

मुंबई दि.२४ :- भारतीय तंत्रशिक्षण संस्था (आयायटी) मुंबईच्या २५ विद्यार्थ्यांना वार्षिक १ कोटी रुपयांपेक्षा अधिक वेतनाची नोकरी मिळाली आहे. या प्रक्रियेत देशांतर्गत आणि विदेशी अशा २९३ आस्थापनांनी दीड हजारांहून अधिक विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध करुन दिल्या होत्या.

६३ आंतरराष्ट्रीय नियुक्तींसह १ हजार ३४१ प्रस्ताव या विद्यार्थ्यांनी स्विकारले. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२२-२३ मध्ये आर्थिक, संशोधन आणि विकास क्षेत्रांमध्ये सरासरी पगारात भरघोस वाढ झाली तर माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर क्षेत्रातील वेतनात काहीशा कपात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *