चीन, जपानसह अन्य काही देशांतून येणा-या प्रवाशांना ‘आरटीपीसीआर’ चाचणी बंधनकारक
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. २४ :- चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलँड या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी सक्तीची असणार आहे. ज्या प्रवाशाला लक्षणे आढळतील किंवा ज्या प्रवाशाची चाचणी पॉझिटिव्ह येईल त्या प्रवाशाला क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
चीन, जपान, साऊथ कोरिया, हाँगकाँग आणि थायलँडवरून येणाऱ्या प्रवाशांना विशिष्ट अर्ज भरणेही सक्तीचे असणार आहे. यात त्यांना आपल्या प्रकृतीची सद्यस्थिती नमूद करावी लागणार आहे.
