राज्य विधिमंडळ अधिवेशनात सोमवारी सीमाप्रश्नाचा ठराव मांडणार- गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
नागपूर दि.२४ :- महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत राज्य विधिमंडळात २६ डिसेंबर रोजी ठराव मांडण्यात येणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. कर्नाटक विधानसभेत मंजूर झालेल्या ठरावापेक्षाही आपला ठराव कणखर असेल.
हा ठराव गुरुवारीच मांडण्यात येणार होता, मात्र आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे तो पुढे ढकलण्यात आला, असे त्यांनी सांगितले
.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादाबद्दल दिलेला शब्द पाळला नाही याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार आहोत, असेही देसाई यांनी सांगितले.