ओडिसा विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर
वृत्तसंस्था
ओडिसा दि.२४ :- एफआयएच ओडीसा हॉकी पुरुष विश्वचषक २०२३ स्पर्धेसाठी १८ जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भुवनेश्वर आणि राऊरकेला येथे १३ ते २९ जानेवारीदरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
भारतीय संघ गट ड मध्ये इंग्लड, स्पेन आणि वेल्ससोबत आहे. या संघाच्या कर्णधारपदाची धुरा हरमनप्रीत सिंगकडे तर अमित रोहिदासकडे उपकर्णधारपद आहे. राउरकेला येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बिरसा मुंडा हॉकी मैदानवर भारताचा सलामीचा सामना स्पेनविरुद्ध होणार आहे.