शाश्वत रोजगार आणि असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांसाठी भारतीय मजदूर संघाचा मुंबईत मोर्चा
मुंबई दि.२४ :- महाराष्ट्रातील कामगारांना शाश्वत रोजगार आणि असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कांच्या प्रश्नांबाबत भारतीय मजदूर संघातर्फे मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून कंत्राटी कामगार पध्दत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक ठिकाणी कामगार कायद्यातील तरतूदींचे पालन होत नाही, असे ‘भामसं’चे म्हणणे आहे.
विविध सरकारी, निमित्ताने सरकारी, बॅंक, वीज, रस्ता, पाणी, शिक्षण, आरोग्य, या खात्यातील कायम स्वरूपी कामासाठी मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार अल्प वेतनावर काम करीत आहे.
त्यांना कोणतीही सुरक्षा नाही. या सर्व कामगारांना सेवेत कायम करून न्याय द्यावा, अर्थसंकल्पामध्ये या बाबत तरतूद करावी अशा मागण्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष नीलेश खरात, भामसंघ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मोहन येणूरे, भा.म.संघाचे राष्ट्रीय सचिव सुरेद्रनजी पांडे यांनी केल्या आहेत. कामगार विभागाचे सहसचिव शिंदे , कामगार उपायुक्त शिरीन लोखंडे , सहाय्यक कामगार आयुक्त अत्तार यांना मोर्चातर्फे निवेदन सादर करण्यात आले.